महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषद शाळा खांडला येथे गाडगे महाराज यांची जयंती संपन्न 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : जिल्हा परिषद शाळा खांडला येथे गाडगे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम गाडगे महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृपाली धारणे समता दूत (बार्टी), ग्रामपंचायत सदस्य वासुदेव दडमल तसेच गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते. कृपाली धारणे समता दूत यांनी गाडगे महाराज यांच्या जीवनावर सखोल असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य वासुदेव दडमल यांनी सुद्धा गाडगे बाबा विषयी सखोल विचार सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शाळेचे मुख्याध्यापक जांभुळकर शिक्षक व आभार गेडाम यांनी मांडले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष , उपाध्यक्ष तसेच सर्व सदस्य, ग्रामपंचायतचे कर्मचारी प्रमोद भरडे , रामकृष्ण गरमळे, राहुल कोवे, अंगणवाडी मदतनीस, गावातील नागरिक त्याचप्रमाणे विद्यार्थी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos