महत्वाच्या बातम्या

 नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या ०२ रायफली गडचिरोली पोलीस दलाने केल्या हस्तगत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : नक्षल्यांच्या घातपाती कारवायांवर प्रतिबंध घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचे नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. टीसीओसी कालावधीत नक्षलवाद्यांकडून देशविघातक कृत्यांना वेळीच आळा घालण्याच्या दुष्टीने पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत असून, आज गडचिरोली पोलीस दलाने नक्षलवाद्यांनी जंगलात पुरून ठेवलेल्या २ रायफली जप्त केल्या. 

२१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १० वाजता चे सुमारास उपविभाग पेंढरी अंतर्गत पोस्टे जारावंडी हद्दीतील जंगल परिसरात मिळालेल्या गोपनीय खबरीच्या आधारे गडचिरोली पोलीस दल, सीआरपीएफ व एसआरपीएफ चे अधिकारी व जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना नक्षलवाद्यांनी जंगलात लपवून ठेवलेल्या ०२ रायफली हस्तगत केल्या. हस्तगत करण्यात आलेल्या रायफलीत ०१ सिंगल बॅरल १२ बोअर रायफल व एसएसआर रायफल चा समावेश होता. 

सदर भियान पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार चव्हाण, प्रभारी अधिकारी पोस्टे जारावंडी, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक धर्मेंद्र कुमार व राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक कांदळकर व जवान यांनी यशवीरित्या कार्य पार पडले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos