महत्वाच्या बातम्या

 आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नांना यश : गोंदिया विधानसभेत होणार रस्त्यांचे रुंदीकरण


- आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून गोंदिया ग्रामीणसह गोंदिया शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी २२५  कोटींची कामे मंजूर : १०० कोटींच्या कामांना लवकरच मिळणार मंजुरी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातून गोंदिया शहरासह गोंदिया ग्रामीण भागातील मुख्य रस्त्यांसाठी २२५ कोटींची कामे मंजूर झाली आहेत, तसेच १०० कोटींची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत, ती लवकरच मंजूर होणार आहेत. गेल्या २७ वर्षात एवढा निधी न मिळालेल्या गोंदिया विधानसभा मतदारसंघासाठी ही ऐतिहासिक मान्यता आहे. परंतु आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नामुळे विकास शैलीतील कामांना मंजुरी मिळाली आहे.

गोंदिया विधानसभा मतदारसंघात गेल्या २७ वर्षांपासून विकासाच्या नावाखाली हेराफेरी करण्यात आली असून विकासकामांच्या नावाखाली केवळ जनतेची दिशाभूल करण्यात आली आहे. २७ वर्षांच्या कामांपेक्षा आता अधिक कामांना मंजुरी देण्यात आली असून, यामुळे गोंदिया शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर रस्त्यांचे जाळे पसरणार आहे. त्यामुळे गोंदिया शहरात येणाऱ्या सर्व ग्रामीण मार्गांचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार असून, ग्रामीण भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.





  Print






News - Gondia




Related Photos