महत्वाच्या बातम्या

 प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी गुणवत्तेसाठी करावा : गटशिक्षणाधिकारी नरेंद्रकुमार कोकुडे 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आरमोरी : विद्यार्थ्याचा सर्वांगीण गुणवत्ता विकास करण्यासाठी शिक्षक सक्षम बनविन्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन केल्या जाते. म्हणुन शिक्षकांनी प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी करावा असे प्रतिपादन आरमोरी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नरेंद्रकुमार कोकुडे यांनी केले. स्टार्स प्रकल्पा अंतर्गत बीआरसी व सीआरसी सदस्याची आरमोरी व वडसा पंचायत समितीची संयुक्त तीसरी पीएलसी कार्यशाळा 20 फेब्रुवारी रोजी गट साधन केंद्र आरमोरी येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन मार्गदर्शन करतांना गटशिक्षणाधिकारी बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी तथा कार्यशाळेचे सुलभक म्हणुन वकिल खेडकर, अरविंद घुटके, आरमोरी केंद्राच्या केंद्र प्रमुख स्नेहलता तुलावे, डोगरगाव केंद्राच्या केंद्र प्रमुख नलिनी शेडमाके, वडधा केंद्राचे केंद्र प्रमुख युवराज भानारकर इत्यादी मान्यवर उपस्थिती होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 व मुल्यमापन या विषयावर सुलभक वकिल खेडकर यांनी सविस्तर मार्गर्शन केले. तर बालकांचे हक्क व सुरक्षितता, वित्तीय नियमावली व अभिलेखे, समता या विषयावर सुलभक अरविंद घुटके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाचे संचालन कु. करुणा बागे यांनी केले तर प्रास्ताविक अरविंद घुटके यांनी केले. उपस्थितीतांचे आभार कु. दिपाली गुडेपवार यांनी मानले. कार्यक्रमाला गट साधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. मोठ्या संख्येनी घीआरसी, सीआरसी सदस्य उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos