गोंदिया जिल्ह्यात ग्रामीण भागातही हेल्मेटची सक्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सडक अर्जुनी : 
गोंदिया जिल्ह्यातील रस्ते अपघातास आळा बसविण्यासाठी १२ नोव्हेंबर पासून  शहरी भागासह ग्रामीण भागातही वाहनचालकाविरुद्ध मोटार कायदा अंतर्गत प्रभावी कारवाई करण्यात येत आहे . पोलीस हवालदार बिसेन व ना. पोलीस वाढई हे कोणाळा ते नवेगाव बांध मार्गावर कारवाई करत आहेत.  आपले चांगले कार्य पार पाडत त्यांनी दोन दिवसांमध्ये ६ हजार ३०० रुपयांचा  दंड वसूल करून शासनाला जमा केला आहे. 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे व राज्य शासनाच्या गृह विभागाच्या परिपत्रकाप्रमाणे मोटर वाहन अधिनियम १९८८ चे कलम १२९ अन्वे राज्यात संपूर्ण क्षेत्रात मोटरसायकल चालविणाऱ्या किंवा तिच्यावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सार्वजनिक ठिकाणी वाहन चालवितांना हेल्मेट वापरले पाहिजे.
त्या अनुषंगाने जिल्ह्यातील रस्ते अपघातास आळा बसविण्यासाठी १२ नोव्हेंबर पासून गोंदिया जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागातही वाहनचालकाविरुद्ध मोटार कायदा अंतर्गत प्रभावी कारवाई करणे सुरु आहे . पोलीस हवालदार बिसेन व ना. पोलीस वाढई हे कोणाळा ते नवेगाव बांध मार्गावर  कारवाई करत  चांगले कार्य पार पाडत आहेत. 
गोंदिया जिल्ह्यातील सर्व नागरिकांना त्यांच्या ताब्यातील वाहन चालवितांना स्वतःचे व जनमाणसाची जीवित हानी होऊ नये याकरिता ही मोहीम शहरी व ग्रामीण भागात राबवत असून सदर वाहतूक निर्देशित आदेशाचा भंग केल्यास संबंधित वाहन चालकांवर कारवाई करणे सुरु आहे .     Print


News - Gondia | Posted : 2018-11-22


Related Photos