महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष  


महत्वाच्या घटना (१५ फेब्रुवारी)

१५ फेब्रुवारी ३९९ : सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

१५ फेब्रुवारी १७७९ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.

१५ फेब्रुवारी १९३९ : काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले.

१५ फेब्रुवारी १९४२ : दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.

१५ फेब्रुवारी १९६५ : कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.

जन्म (१५ फेब्रुवारी)

१५ फेब्रुवारी १५६४ : इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ गॅलेलिओ गॅलिली यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १६४२)

१५ फेब्रुवारी १७१० : फ्रान्सचा राजा लुई (पंधरावा) यांचा जन्म. (मृत्यू: १० मे १७७४)

१५ फेब्रुवारी १८२४ : बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा यांचा जन्म. (मृत्यू: २६ जुलै १८९१)

१५ फेब्रुवारी १९३४ : स्विस संगणक शास्त्रज्ञ व पास्कल प्रोग्रामिंग लॅग्वेज निर्माते निकालूस विर्थ याचा जन्म.

१५ फेब्रुवारी १९४९ : दलित साहित्यिक नामदेव लक्ष्मण ढसाळ यांचा जन्म. (मृत्यू: १५ जानेवारी २०१४)

१५ फेब्रुवारी १९५६ : वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू डेसमंड हेन्स यांचा जन्म.

15 फेब्रुवारी १९७९ : न्यूझीलंडचा क्रिकेटपटू हामिश मार्शल यांचा जन्म.

मृत्यू (१५ फेब्रुवारी)

१५ फेब्रुवारी १८६९ : ऊर्दू शायर मिर्झा ग़ालिब यांचे निधन. (जन्म: २७ डिसेंबर १७९७)

१५ फेब्रुवारी १९४८ : हिन्दी कवयित्री सुभद्राकुमारी चौहान यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १९०४)

१५ फेब्रुवारी १९५३ : किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक सुरेशबाबू माने यांचे निधन.

१५ फेब्रुवारी १९८० : कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय मनोहर दिवाण यांचे निधन.

१५ फेब्रुवारी १९८० : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष कॉंम्रेड एस. एस. मिरजकर यांचे निधन.

१५ फेब्रुवारी १९८८: क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक रिचर्ड फाइनमन यांचे निधन. (जन्म: ११ मे १९१८)





  Print






News - todayspecialdays




Related Photos