सुपर स्मेल्टर्स लिमिटेड १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार : विदर्भात भव्य स्टील प्रकल्पाची सुरुवात


- गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात स्टील प्रकल्प; हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : पोलाद उत्पादन क्षेत्रातील प्रमुख कंपनी सुपर स्मेल्टर्स लिमिटेड विदर्भात १० हजार कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक करण्यास सज्ज आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात हा प्रकल्प साकारण्याच्या दृष्टीने योजना आखली जात आहे, आणि यामुळे लाखो लोकांना रोजगाराच्या संधी मिळण्याची अपेक्षा आहे.
सकारात्मक चर्चा आणि सामंजस्य करार -
राज्याच्या उद्योग सचिवांशी या प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा झाली असून, आगामी अॅडव्हांटेज विदर्भ-खासदार औद्योगिक महोत्सवात अधिकृत सामंजस्य करार होण्याची दाट शक्यता आहे. खास गोष्ट म्हणजे, सरकारने या प्रकल्पासाठी संपर्क साधण्याऐवजी कंपनीने स्वतःहून विदर्भातील औद्योगिक संधी ओळखून गुंतवणुकीचा प्रस्ताव मांडला आहे.
विदर्भ: देशाचे स्टील हब -
गडचिरोलीतील सूरजागड येथील लोहखनिजाच्या उपलब्धतेमुळे विदर्भ भविष्यात देशाचे मोठे स्टील हब म्हणून उदयास येत आहे. यापूर्वी, जेएसडब्ल्यूसारख्या दिग्गज कंपन्यांनीही येथे प्रकल्प स्थापन केले आहेत. सुपर स्मेल्टर्सच्या या नव्या गुंतवणुकीमुळे विदर्भातील औद्योगिक विकासाला गती मिळेल आणि स्थानिक रोजगार संधी वाढतील.
कंपनीची पार्श्वभूमी -
सुपर स्मेल्टर्स लिमिटेडचा मुख्यालय दिल्ली आणि कोलकाता येथे असून, साई ग्रुप ऑफ कंपनीजचा एक भाग आहे. कंपनीची स्थापना २० जून १९९५ मध्ये झाली, आणि ती सुपरशक्त्ती या ब्रँडअंतर्गत पोलाद उत्पादनांची विक्री करते.
पश्चिम बंगालमधील जमुरिया येथे कंपनीने अत्याधुनिक एकात्मिक स्टील प्रकल्प आणि वीज प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित केले आहेत. या प्रकल्पामुळे विदर्भात औद्योगिक क्रांतीला सुरुवात होईल, आणि स्थानिक विकासाला एक नवा वळण मिळेल.
News - Nagpur




Petrol Price




