महत्वाच्या बातम्या

 माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते कब्बड्डी व व्हॉलीबाॅल स्पर्धेचे उदघाटन


- जय सेवा बाॅय - बाॅय क्लब नैनगुडा यांच्या वतीने भव्य ग्रामीण कब्बड्डी व व्हॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / एटापल्ली : तालुक्यातील नैनगुडा येथे जय सेवा बाॅय - बाॅय क्लब यांच्या वतीने भव्य ग्रामीण कब्बड्डी व व्हॉलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर क्रीडा स्पर्धेसाठी पहिला, दुसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या स्पर्धेच्या विजेता संघाला देण्यात येत आहे. आज सदर स्पर्धेचे लोकप्रिय माजी जिल्हा अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या शुभ हस्ते उदघाटन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे आदिवासीचे विविध नूत्य करून व ढोल ताशाने जंगी स्वागत केले. या कर्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून  कोटामी ग्रामपंचायतचे सरपंच सिंधू मुहुंदा होते.

यावेळी उपस्थित सुधाकर गोटा, वेलासर इलका गोटुल प्रमुख, प्रज्वाल नागुलवार, कमल हेडो सरपंच कसनसुर, विलास कोटामी सरपंच, अनील करमरकर, महादेव पदा उप सरपंच ग्राम पंचायत कोटमी, बंडू कोल्हा पोलीस पाटील, सनाकू कोल्हा गाव भुमिया, हरेकृष्णा सरकार, सादू मट्टामी, खेळकर , छाया कोवासे, नरेश गावडे, राजु गोमाडी, शेख ,कोटमी, नारायण पेंदोर सरपंच, अर्चना मडावी अंगणवाडी सेविकांसह नैनगुडा परिसरातील आविसचे शेकडो कार्यकर्ते व गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos