महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांचे क्रीडास्पर्धा संपन्न


- समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली व दिव्यांगांच्या विशेष शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / देसाईगंज : स्व. राजीव गांधी अपंग विद्यालय, हेटी बंगला येथे जिल्हास्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राजेंद्र भुयार मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली, कार्यक्रमाचे अध्यक्ष चेतन हिवंज संवर्ग विकास अधिकारी आरमोरी, विशेष अतिथी पुरुषोत्तम चापले, डॉ. सुरेश कुंभरे जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी गडचिरोली, निलेश तोरे स.क.नि. व स.ले.अ. पुष्पा पारसे, निखिल उरकुडे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून बोलताना राजेंद्र भुयार म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता विशेष शिक्षकाची भूमिका मोलाची असते.

दिव्यांगांना सामाजिकिरणात सामावून घेऊन त्यांना सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण देणे तसेच समाजातील प्रत्येक नागरिकांनी दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याकरिता प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. आपल्यामधे विशेष कौशल्य आहेत त्याच कौशल्याच्या बळावर आपण जग जिंकू शकता आपल्या सर्वांमध्ये ते गुण आहेत. या दिव्यांग मुलांना शिकविणे फारच मोठे कार्य आहे. आव्हानात्मक काम करून दिव्यांगांना शिकविणारे शिक्षक खरेच कर्तृत्ववान आहेत असे प्रतिपादन केले. सकाळी ९:०० वा शालेय क्रीडांगणात क्रीडाध्वज ला मानवंदना देवून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडास्पर्धाला सुरुवात करण्यात आली.

त्यानंतर संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी प्रास्ताविक पर भाषण डॉ. सुरेश कुंभरे समाज कल्याण अधिकारी गडचिरोली यांनी केले तर संचालन चव्हाण यांनी केले. व उपस्थित सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापक पुरुषोत्तम कामथे यांनी आभार मानले. समाज कल्याण विभागातर्फे कार्यक्रमास सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील २५० हुन अधिक शालेय दिव्यांग विद्यार्थ्यांनि सहभाग घेतला. या कार्यक्रमास जिल्ह्यातील खाजगी दिव्यांग शाळेचे मुख्याध्यापक, विशेष शिक्षक तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos