महत्वाच्या बातम्या

 निरोगी शरीर आणि मन विकसित करण्यासाठी खेळ महत्त्वाचे : युवा नेते रोहित अग्रवाल


- युवा नेते रोहित अग्रवाल यांनी वायएमसी गोंदिया आयोजित अखिल भारतीय निमंत्रित व्हॉली बॉल स्पर्धेतील खेळाडूंना संबोधित केले.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : गोंदिया शहरातील टीबी टोली मैदानावर वायएमसी गोंदिया तर्फे अखिल भारतीय निमंत्रित व्हॉली बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये युवा नेते रोहित अग्रवाल यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवून खेळाडूंना मार्गदर्शन केले की, निरोगी शरीर आणि मन विकसित करण्यासाठी खेळ महत्वाचे आहे. याचे अनेक प्रकार आहेत. आपल्या शारीरिक तसेच मानसिक विकासास मदत करते. सतत अभ्यास करताना अनेक वेळा तणावाची परिस्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत हा तणाव दूर करण्यासाठी खेळ हे उत्तम माध्यम आहे. अशा प्रकारे युवा नेते रोहित अग्रवाल यांनी कार्यक्रमाच्या  उपस्थिती नोंदवून मार्गदर्शन केले.

यावेळी सौ.वर्षा प्रफुल पटेल, अशोक इंगळे माळी शहर अध्यक्ष गोंदिया, युवानेता रोहित अग्रवाल, धर्मेशजी अग्रवाल, वहाब सर, जावेद खान जी, नारिक , बहेलिया व वाय.एम.सी.चे सर्व सभासद प्रामुख्याने उपस्थित होते.





  Print






News - Gondia




Related Photos