महत्वाच्या बातम्या

 धानोरा तालुक्यातील ६१ दिव्यांग विद्यार्थ्यांची बुद्धिगुणाक चाचणी : मानसोपचार तज्ञांनी केली तपासणी


- दिंव्याग व युडीआयडी प्रमाणपत्र शिबिर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / धानोरा : जिल्हा परिषद आणि जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली तसेच मित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने समावेशित शिक्षण उपक्रमांअतर्गत बौद्धिक दृष्ट्या अक्षम विदयार्थ्यांसाठी स्वावलंबन पोर्टलच्या माध्ममातून दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्ड देण्यासाठी तपासणी व निदान विशेष मोहिम कार्यक्रमांतर्गत बुद्धीगुणांक चाचणी शिबिर 02 फेब्रुवारी २०२३ ला कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा येथे आणि जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कारवाफा येथे ०३ फेब्रुवारी २०२३ ला दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 61 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.

शिबिराला प्रामुख्याने अतिरिक्त जिल्हा वैद्यकीय अधिकारी, डॉ. संजय जठार संवर्ग विकास अधिकारी सतिश टिचकुले , अतिरिक्त  पंचायत समिती धानोराचे संवर्ग विकास अधिकारी कोमलवार , गटशिक्षणाधिकारी आरवेली, वैद्यकीय अधिक्षक ग्रा. रु. धानोरा गजबे, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी सुधीर आखाडे , शिक्षण विस्तार अधिकारी वैद्य, शिक्षण विस्तार अधिकारी मेश्राम, मानसोपचार तज्ञ श्रद्धा अजय खैरकर उपस्थित मान्यवरांनी विदयार्थ्यांशी आणि पालकांशी हितगुज साधून समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी केजीबीवी मुख्याध्यापिका कुळमेथे, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कारवाफा येथील मुख्याध्यापिका पोरेटी, ब्राम्हणकर विषयतज्ञ, आकाश चांदेकर, नाजूक पाटिल, किरंगे यांच्यासह शाळांचे शिक्षक व गटसाधन केंद्रातील सहारे ब्राम्हणवाडे, दुग्गा, थाईत, मडावी यांनी सहकार्य केले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos