महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली : टीसीओसीच्या पार्श्वभूमीवर १ जहाल नक्षल व १ जनमिलिशियास अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : फेब्रुवारी ते मे महिन्या दरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान सरकारी मालमत्तेचे नुकासान करणे, पोलीस दलावर हल्ले करून त्यांच्या जवळील शस्त्रे लुटुन नेणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे इ. देशविघातक कृत्य करत असतात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने एका जहाल नक्षलवाद्यांस व एका जनमिलिशियास २८ जानेवारी २०२३ ला अटक केले.

जहाल नक्षली मंगेश ऊर्फ कांडेराम पोटावी (३३) रा. होरादी ता. जि. नारायणपूर (छत्तीसगड) येथील रहीवासी असून सन २००५ मध्ये नक्षल दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन तो सध्या परलकोट दलममध्ये सीएनएम (चेतना नाट्यकला मंच) कमांडर या पदावर कार्यरत होता. त्याच्यावर २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मौजा गुरपा जंगल परिसरात पोलीस पाटीलवर ॲम्ब्यू व चकमक तसेच मौजा येरवडा जंगल परिसरातील चकमक सन २००९ मध्ये जाळपोळ, दरोडा, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे इ.  गुन्हे नोंद असून २८ जानेवारी २०१३ ला उपविभाग एटापल्ली मधील उपपोस्ट बानसूर हद्दीतील कसनसूर या गावात आला, या गोपनिय माहितीच्या आधारे पोलीस पाटील अभियानादरम्यान त्याला ताब्यात घेतले. त्यास २००१ साली उपपोस्टे कसनसूर येथे दाखल अप.क्र. ०७/२००१९ या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. सोबतच प्राथमिक माहितीनुसार नारायणपुर (छत्तीसगढ़) यथे गुन्हा दाखल असून अधिकचा तपास नारायणपुर पुलिस यांच्या सहकार्याने गडचिरोली पोलीस दल करीत आहेत.

तसेच चिन्ना मासे झोरे (४०) रा. रामनटोला ता. एटापल्ली जि. गडचिरोली येथील असून तो सन २००५ पासून गट्टा दलमध्ये जनमिलिशिया सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर मौजा गर्देवाडा जंगल परिसर कास्टिंग व चकमक २०१४ व मौजा कुरेनार (छत्तीसगढ़) येथील रोड कामावरील वाहन जाळपोळ इ. गुन्हे दाखल आहेत. २८ जानेवारी २०१३ रोजी पोमके गट्टा (जॉ.) हद्दीत पोलीस पार्टीने मौजा टिटोळा ते जांबिया जंगल परिसरात अभियान राबवित असतांना ताब्यात घेण्यात आले. त्यास २०१४ मध्ये पोस्टे एटापल्ली येथे दाखल अप. क्र. १३/२०१४ मौजा गर्देवादा येथे झालेल्या ब्लास्टींग चकमक या गुन्हयात अटक करण्यात आली, असून पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

गडचिरोली पोलीस दलाने राबविलेल्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे जानेवारी २००२ ते आतापर्यंत एकूण ६२ नक्षलवाद्यांना अटक, ०८ नक्षलवायांचे आत्मसमर्पण व ०३ नक्षलवाद्यांचा पोलीस नक्षल चकमकीमध्ये मृत्यु झाला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अहेरी, यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल ज्यांनी नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर अंकुश लावण्यासाठी नक्षलविरोधी अभियान तीव्र असून नक्षलवाद्यांनी हिंसक वाट सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos