गडचिरोली : खुनाच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : सुमारे २ वर्षांपूर्वी घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. खुनाचा गुन्हा सिद्ध न झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश शुक्ल यांनी हा आदेश दिला. अहेरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत जून २०२१ मध्ये ही घटना घडली होती. आकाश किशोर कुम्मावार रा. अहेरी ता. अहेरी असे निर्दोष मुक्तता केलेल्याचे नाव आहे. आपल्या आईच्या हत्येच्या आरोपात कुम्मावार यांना अहेरी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सदर प्रकरणाचा तपास करून अहेरी पोलिसांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. या प्रकरणात एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र सरकारी पक्षाला आकाश किशोर कुम्मावार यांनीच त्यांच्या आईच्या खून केल्याचे सिद्ध करता न आल्याने विद्य. प्रधान सत्र न्यायाधीश, गडचिरोली यांच्या न्यायालयाने आरोपीची निर्दोष मुक्तता केली. आरोपीतर्फे अँड. विभास विजय न्यालेवार, गडचिरोली यांनी काम पाहिले.
News - Gadchiroli