महत्वाच्या बातम्या

 वाकल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्य नावीन्यपूर्ण उपक्रम


- कु. आचल वामन कोकोडे या विद्यार्थिनीला राष्ट्रध्वज फडकविण्याचा  मिळाला बहुमान

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील वाकल येथील इय्यता १० व्या वर्गातील सर्वात जास्त ८४.८० गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थीनी कु. आचल वामन कोकोडे हिला गावातील एकता चौक येथील मुख्य चौकातील राष्ट्र ध्वज फडकविण्याचा बहुमान देण्यात आला.

वाकल येथील ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेऊन, असे ठराविण्यात आले कि, इय्यता १० वी व इय्यता १२ वी वर्गात जो विध्यार्थी अथवा विध्यार्थिनी किमान ८०% किंवा त्या पेक्षा जास्त गुण घेऊन पास होईल व गावातून सर्वात जास्त गुण घेईल त्या विध्यार्थ्याला एक दिवशीय पदाचा मान म्हणजेच १२ वी करिता सरपंच पदाचा मान व १० वी करिता उपसरपंच पदाचा बहुमान त्याच प्रमाणे त्याला राष्ट्रध्वज फडकविण्याचा बहुमान देण्यात येईल.

त्याच अनुषंगाने  २६ जानेवारीला गणराज्य दिनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आले व  कु. आचल वामन कोकोडे या विध्यार्थिनीला राष्ट्रध्वज फडकविण्याचा बहुमान तसेच एक दिवशीय उपसरपंच पद देण्यात आले. याद्वारे विध्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची स्पर्धा निर्माण होऊन अभ्यासात चालना मिळेल, असे ग्रामपंचायत वाकल येथील पदाधिकारी यांचे म्हणणे आहे.

याप्रसंगी सरपंच राहुल पंचभाई वाकल, उपसरपंच दिनेश मांदाळे, सदस्य राहुल चिम्मलवार, नीलिमा पोपटे, मंगला गावतुरे, सविता कोकोडे, नंदा भोयर, जि.प. शाळेतर्फे टेम्भूरने, रामटेके, गोरले, अंगणवाडी तर्फे वंदना कावळे, उषा कावळे तसेच सुरेश नागदेवते, रामचंद्र मोहुर्ले, सागर गेडाम, हरिश्चंद्र मांदाळे, महादेव भेंडारे इ. उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos