महत्वाच्या बातम्या

 प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस स्टेशन कोरची येथे विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / कोरची : यावर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस स्टेशन कोरची येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रम हे पोलीस उपअधीक्षक झरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश फुलकुवर व पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी आयोजित केले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नगरपंचायत कोरची येथील नगराध्यक्ष सौ. हर्षलता भैसारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार बोदेले, नायब तहसीलदार गणेश सोनवानी, प्रभारी अधिकारी गणेश फुलकुवर, पोलीस निरीक्षक कवडो, पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी  उपस्थित होते.

तहसील कार्यालय कोरची येथील ध्वजारोहणा नंतर पोलीस स्टेशन कोरची येथे शाळकरी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये केंब्रिज केरला मॉडेल स्कूल, रियल इंग्लिश मीडियम स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरची, धुवारिया कॉन्व्हेंट कोरची, पारबताबाई विद्यालय, श्रीराम विद्यालय, मोरेश्वर फाये कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण केंद्र , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जामडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेळगाव येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपले कलाकुशल दाखवून मंचावर विविध कार्यक्रम केले. यावेळी विद्यार्थ्यांचे वर्ग, शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरज हेमके, संचालन मुरलीधर रुकमोडे यांनी तर आभार आशिष अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos