महत्वाच्या बातम्या

 खासदार क्रीडा महोत्सवामध्ये जास्तीत संख्येन खेळाडूंनी सहभाग घ्यावा : खासदार रामदास तडस


- खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत भव्य विदर्भ स्तरीय टेनिस बाॅलचे खुले सामने

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा :  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळ आणि खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळावे म्हणून प्रत्येक लोकसभा क्षेत्रात खासदार क्रीडा महोत्सव आयोजन करण्याचे आवाहन केले आहे, त्यानुसार आज वायगांव येथे खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत विदर्भस्तरीय क्रीकेट सामने सुरु झालेले आहे, तसेच खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत जुडो कराटे, कुस्ती, कबड्डी, धनुर्विद्या, बास्केट बाॅल, हाॅकी, व्हाॅलीबाॅल, बॅटमींटन, कॅरम, बुध्दीबळ, मॅराथान, फुटबाॅल, खो-खो, जलतरण, बाॅक्सिंग, चित्रकला, स्क्वॅश, शरीर सौष्ठव, टेबल टेनीस, योगा प्रतियोगीता तसेच सांस्कृतिक कार्यक्रम वर्धा लोकसभा क्षेत्रात विविध ठिकाणी होणार आहे, या खासदार क्रीडा महोत्सवात जास्तीत खेळाडूंनी जास्तीत संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन खासदार रामदास तडस यांनी केले.

वायगांव (नि) ता. जि. वर्धा येथे खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत आयोजीत टीम ॲव्हेजंर स्पोर्टींग क्लब यांच्या सहयोगाने भव्य विदर्भ स्तरीय टेनिस बाॅलचे खुले सामन्याचा उद्घाटन सोहळा खासदार रामदास तडस यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यावेळी वायगांवचे सरपंच प्रविण काटकर, पोलीस उपनिरीक्षक जगदिश हटवार, विजय हातमोडे, प्रमोद झाडे, बाबाराव घोडे, नरेन्द्र सोनपिंपळे, मोहन तळवेकर, गणेश देवतळे उपस्थित होते.

खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत भव्य क्रीकेट सामन्यामध्ये विदर्भातील 60 टीम सहभागी होणार आहे, यावेळी खासदार रामदास तडस यांनी क्रीकेट खेळून जोरदार फटकेबाजी केली तसेच खेळाडूंचा उत्साह वाढविला.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता टीम ॲव्हेजंर स्पोर्टींग क्लबचे अध्यक्ष जुबेर काझी, सुरज चटटे,  विकी वाघमारे, हनिफ शेख, दानिश मानकर, अमन खडसकर, नामा करनाके यांनी परिश्रम घेतले यावेळी खेळाडूं व मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos