वैनगंगा नदीत दोन सख्ख्या भावांना जलसमाधी, व्याहाड खुर्द येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सावली :
मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी वैनगंगा नदीत गेल्यानंतर पाण्यात उतरलेल्या मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात दोन सख्ख्या भावंडांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज ४ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीत घडली.
श्रेयस विनोद तोडेवार (२०) आणि संकेत विनोद तोडेवार (१८) रा.रा. व्याहाड खूर्द अशी मृतकाची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार श्रेयस आणि संकेत आपल्या अकरा मित्रांसह पार्टी करण्यासाठी वैनगंगा नदीपात्रात गेले. यावेळी ओमकार संगीडवार हा पाण्यात उतरला. काही वेळाने तो गटांगळ्या खावू लागल्याने त्याला वाचविण्यासाठी श्रेयस पाण्यात उतरला. ओमकार याला श्रेयसने वाचविले. मात्र स्वतः पाण्यात बुडायला लागला. यामुळे लहान भाऊ संकेत हा आपल्या भावाला वाचविण्यासाठी धावून गेला. मात्र खोल पाण्यात दोघांचाही करूण अंत झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून सख्ख्या भावंडांच्या मृत्यूमुळे व्याहाड खूर्द गाव शोकसागरात बुडाले आहे. 

   Print


News - Chandrapur | Posted : 2018-11-04


Related Photos