भरधाव कारने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या चार तरुणांना उडविले : दोघांचा मृत्यू


- परभणी जिल्ह्यातील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / परभणी :
पोलीस भरतीसाठी तयारी करत असणाऱ्या चार तरुणांना भरधाव कारने उडवल्याची घटना शुक्रवारी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात माटेगाव येथे घडली. यातील दोन तरुणांचा मृत्यू झाला असून सोनू साबळे (१८) आणि गोविंद साबळे (२१) अशी मृतकांची नावे आहेत.
माटेगाव येथील चार तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत होते. शारीरिक चाचणीसाठी ते चौघेही धावण्याचा सराव करत होते. यादरम्यान, त्यांना  भरधाव तव्हेरा कारने उडवले असून यात दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

   Print


News - Rajy | Posted : 2018-11-02


Related Photos