महत्वाच्या बातम्या

 कोरोना काळात भरलेली शाळेची फी परत मिळणार : कोर्टाचे सर्व खासगी शाळांना आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / अलाहाबाद : कोरोना काळात सर्व शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. ऑनलाईन शिक्षणामुळे शाळेकडून देण्यात येणाऱ्या बऱ्याच सुविधांपासून विद्यार्थी अलिप्त होते.

मात्र, तरीही शाळांमार्फत पूर्ण फी आकारण्यात आली. याविरोधात अलाहाबाद कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आता अलाहाबाद कोर्टाने उत्तर प्रदेशमधील सर्व पालकांना दिलासा दिला आहे. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांत भरलेली १५ टक्के फी शाळेतून परत मिळणार आहे. याबाबत अलाहाबाद कोर्टाने उत्तर प्रदेशमधील सर्व शाळांना शुल्क परतावाचे आदेश दिले आहेत.

कोरोना काळात शाळा बंद असतानाही काही शाळांकडून संपूर्ण फी आकारण्यात आली. शाळांकडून देण्यात येणाऱ्या सुविधा कोरोना काळात मिळाल्या नाहीत. मात्र, तरीही त्या सुविधांचे पैसे शाळांकडून वसूल करण्यात आले. याप्रकरणी अलाहाबाद न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी न्यायमूर्तींनी शाळांना फटकारले आहे. शाळा बंद असतानाही पूर्ण फी का आकारण्यात आली? याबाबत सवालही उपस्थित करण्यात आला. त्यामुळे शाळांनी पालकांना शुल्काची रक्कम परत करावी, असे आदेश न्यायालायने दिले आहेत. २०२०-२१ या एका शैक्षणिक वर्षाचेच शुल्क परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कोरोना काळात ज्या शाळांनी फी कमी केली होती त्या शाळांना दिलासा देण्यात आला आहे. या शाळांनी फी परत करू नये, असं न्यायालायने म्हटलं आहे.

ज्या शाळांनी पूर्ण फी आकारली होती त्या शाळांनी येत्या दोन महिन्यात ही १५ टक्के फी परत द्यावी, असे आदेश न्यायालायने दिले आहेत. तसंच, ज्या मुलांनी शाळा सोडली आहे त्या विद्यार्थ्यांनाही १५ टक्के फी परत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos