महत्वाच्या बातम्या

 वरोरा पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / वरोरा : वरोरा पोलीस स्टेशन परिसरात पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहभागातून स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. पोलीस स्टेशन परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश झांबरे, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत गोरकार, पोलीस उपनिरीक्षक अशोक यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते. या उपक्रमादरम्यान पोलीस स्टेशन परिसराची स्वच्छता करण्यात आली तसेच परिसरात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. दरम्यान, वरोरा पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या बगीच्याचेही सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे.

बगीच्याची देखभाल, सुशोभीकरण आणि वृक्षलागवडीमुळे येत्या काही दिवसांत पोलीस स्टेशनचा परिसर अधिक हिरवागार व आकर्षक दिसणार आहे. पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमामुळे परिसरातील स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाला चालना मिळणार असून, नागरिकांनीही आपल्या परिसरात स्वच्छता राखत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos