गडचिरोलीत आज काँग्रेसचा भव्य पदग्रहण सोहळा : ऍड. विश्वजीत कोवासे यांचा सत्कार, शेतकरी मेळाव्याचेही आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : विश्वजीत मारोतराव कोवासे यांच्या पदग्रहण सत्कार सोहळा तथा शेतकरी मेळाव्याचे आज मंगळवार, २६ मे २०२६ रोजी गडचिरोली येथे भव्य आयोजन करण्यात आले आहे. गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम दुपारी ४ वाजता धानोरा रोडवरील सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या घरासमोरील प्रांगणात पार पडणार आहे.
या सोहळ्यास काँग्रेस पक्षातील राज्य व राष्ट्रीय स्तरावरील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस विधीमंडळ गटनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार राहणार आहेत.
कार्यक्रमाला भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेव किरसान, माजी खासदार मारोतराव कोवासे, महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, विधान परिषदेचे आमदार अभिजीत वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, महाराष्ट्र प्रभारी कुणाल चौधरी, आदिवासी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव पुरके, पंचायत राजचे प्रदेशाध्यक्ष संजय ठाकरे, युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी नवज्योत सिंग सिंधू तसेच माजी जिल्हाध्यक्ष महेंद्रमाऊ ब्राह्मणवाडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
तसेच भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव अजय चिकारा, एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष सागर साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव रविंद्र दरेकर, सचिव अजय कंकडालवार, पंकज गुड्डेवार, माजी जिल्हा परिषद सदस्य राम मेश्राम, माजी नगरसेवक बंडू शनिवारे आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमात नवनियुक्त जिल्हाध्यक्ष ऍड. विश्वजीत कोवासे यांचा सत्कार करण्यात येणार असून शेतकरी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एनएसयूआय, सेवादल तसेच विविध फ्रंटल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




