ग्रामपंचायत टेकला येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : काल ९ ऑगस्ट २०२६ रोज रविवार ला ग्रामपंचायत टेकला येथे जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बुकलू गोंगलू लेकामी उपसरपंच तर उद्घाटक म्हणून व्ही. पी. वेलादी ग्रामपंचायत अधिकारी हे होते प्रमुख अतिथी म्हणून संतू गावडे होते.
आयोजन समितीचे अध्यक्ष मधुकर दुर्वा, उपाध्यक्ष बाजु दुर्वा, सचिव दुलसा दुर्वा, सहसचिव वंजा कोवासी, कार्याध्यक्ष पांडु बोगामी होते, तसेच अंगणवाडी सेविका सिता पुंगाटी, आशा वर्कर जया दुर्वा, ग्रामस्थ शंकर दुर्वा, वंजा दुर्वा,चंदु दुर्वा,रानु पुंगाटी, सम्मा कुडयेटी,मुंशी कुळयेटी लालू नरोटी, सूरज दुर्वा उपस्थित होते.
कार्यक्रम सकाळी १०.०० वाजता भूमक मधुकर दुर्वा यांनी विधिवत पूजन करून शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या मुर्तीला हार अर्पण करण्यात आले व रैली काढण्यात आले आणि जल,जंगल, जमीन हमारा हक्क आहे असे घोषणा दिल्या. नंतर ग्राम सभा घेऊन आदिवासींच्या संस्कृती व परंपरा बाब व्ही.पी.वेलादी ग्राम पंचायत अधिकारी व बुकलू गोंगलू लेकामी यांनी मार्गदर्शन केले. आनंदमय वातावरनात आदिवासी दिवस साजरा करण्यात आले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन दुलसा दुर्वा यांनी केलेत.
News - Gadchiroli




Petrol Price




