महत्वाच्या बातम्या

 सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी माजी मंत्री सुनील केदार यांना एक वर्षाची शिक्षा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार, माजी मंत्री सुनील केदार यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज एका वर्षाची शिक्षा आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला.

2017 मध्ये महापारेषणच्या साहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी सुनील केदार यांना दोषी ठरवण्यात आले आहे. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज हा निर्णय दिला. नागपूर येथील केळवद पोलीस ठाण्यामध्ये सुनील केदार यांच्याविरोधात सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. कोराडी ते तिडंगीदरम्यान अतिउच्चदाब वाहिनीचे काम करणाऱ्या महापारेषणच्या सहाय्यक अभियंत्यासह कर्मचाऱ्यांना सुनील केदार यांनी मारहाण केली होती.

नागपूर जिह्यातील तेलगाव येथे 2017 मध्ये शेतकऱयांच्या शेतातून महापारेषणचे टॉवर टाकण्याचे काम सुरू होते. या कामामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत होते, मात्र शेतकऱ्यांना कोणतीच नुकसानभरपाई दिली गेली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याची तक्रार सुनील केदार यांच्याकडे केली. त्यानंतर लगेचच सुनील केदार हे घटनास्थळी पोहचले व त्यांनी काम बंद पाडले. यावेळी उपस्थित इंजिनीअर व महापारेषणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. याची तक्रार केळवद पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.





  Print






News - Nagpur




Related Photos