महत्वाच्या बातम्या

 कारच्या धडकेत स्कूलबस उलटली : विद्यार्थी जखमी, जीवितहानी टळली करंजी काजी जवळ भीषण अपघात , जखमी विद्यार्थ्यांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : करंजी काजी ते करंजी भोगे मार्गावरील पुलाजवळ सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात स्कूलबस आणि कारची समोरासमोर धडक होऊन स्कूलबस उलटली. या अपघातात बसमधील काही विद्यार्थी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात सोमवारी सकाळी सुमारे ८.१५ वाजता घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा येथील सुशील हिंमतसिंगका विद्यालयाची क्र. एमएच-३४ एबी-८११४) स्कूलबस मदनी, दिंदोडा, करंजी (काजी), पवनी आणि करंजी (भोगे) येथील विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे जात होती. यावेळी पुलाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या कार (क्र. एमएच-३२ एएस-४९४०) आणि स्कूलबसची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, बस रस्त्यावरच उलटली.

अपघाताच्या वेळी बसमध्ये १७ ते १८ विद्यार्थी प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमी विद्यार्थ्यांना त्वरित कस्तुरबा रुग्णालय, सेवाग्राम येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात ओम नागतोडे, भूमिका नखाते, धनश्री चौधरी, चिराग कुबडे, अथर्व चरडे, पवन तिखे, जान्हवी तिखे आणि अंशू नागतोडे हे विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.





  Print






News - Wardha




Related Photos