माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त : माओवाद्यांनी पुरुन ठेवलेले साहित्य गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ कडून नष्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गोपनिय माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या अभियानादरम्यान जवानांकडून विविध माओवादी साहित्य घटनास्थळीच करण्यात आले. नष्ट गडचिरोली जिल्ह्यातील माओवाद आता संपूष्टात आला असून, गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळ देखील जवळजवळ संपूष्टात आली आहे.
सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या तसेच घातपाताच्या कारवाया करण्याच्या उद्देशाने माओवाद्यांकडून विविध प्रकारचे शस्त्र व स्फोटक साहित्याचा वापर केला जात असे.
आंतरराज्यीय सिमावर्ती भागातील दुर्गम जंगल परिसराचा फायदा घेत माओवाद्यांकडून हेे साहित्य तयार करण्यात येऊन गोपनियरित्या जंगल परिसरात जमीनीमध्ये लपवून ठेवले जात असे. त्याचा वापर विविध नक्षल सप्ताह, निवडणूक इ. प्रसंगी सुरक्षा दलांवर घातपात करुन आणण्यास केला जात होता. या विरोधात २३ व २७ मे २०२६ रोजी केलेल्या कारवाईसोबतच काल २७ जून २०२६ रोजी पुन्हा एकदा प्रभावी कारवाई करत माओवाद्यांनी जंगलामध्ये जमिनीत लपवून ठेवलेले साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस व सिआरपीएफच्या जवानांना यश आले आहे.
मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे माओवाद्यांनी महाराष्ट्र - छत्तीसगड सिमेवरील बालबेडा जंगल परिसरात शस्त्रनिर्मिती व इतर साहित्य लपवून ठेवले असल्याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस दलास मिळाल्याने २६ जून २०२६ रोजी पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता यांच्या संयुक्त ०६ तुकड्या, बिडीडीएसचे ०१ पथक व सिआरपीएफचे पथक शोध अभियान राबविणे कामी रवाना करण्यात आले होते.
२७ जून २०२६ रोजी सदर जंगल परिसरात विशेष अभियान पथकांकडून घेरा घालुन बिडीडीएसच्या जवानांनी परिसराची कसून तपासणी केली असता, ५ ते ६ टन वजन असलेली ०१ नग लेथ मशीन, १५० नग क्लेमोर व बिजीएल पाईप्स, २२० नग १२ बोअर पाईप, २० नग रायफल रॉड मेटल पट्टी इ. माओवादी साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरुन मिळालेले सर्व माओवादी साहित्य पथकातील जवानांच्या सहाय्याने जागीच नष्ट करण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे यांच्या देखरेखीखाली विशेष अभियान पथक गडचिरोली व प्राणहिता, इंट सेल, तसेच बीडीडीएस पथकातील जवानांनी यशस्वीरित्या पार पाडली असून पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांनी या कार्यवाहीत सहभागी जवानांचे कौतुक केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




