विदर्भ ओबीसी मंडल यात्रेचे ८ ऑगस्टला बल्लारपुरात आगमन : भव्य बाईक रॅलीसह जाहीर सभेचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित विदर्भ ओबीसी मंडल यात्रा ३ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत विदर्भातील विविध जिल्ह्यांतून प्रवास करत असून, ८ ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी ५.३० वाजता यात्रेचे बल्लारपूर येथे आगमन होणार आहे. ही यात्रा भंडारा येथून प्रारंभ होऊन गोंदिया, नागपूर, नागपूर ग्रामीण, वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, अमरावती आणि गडचिरोली मार्गे ९ ऑगस्ट रोजी चंद्रपूर येथे समारोप होणार आहे.
यात्रेच्या निमित्ताने बल्लारपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांपासून भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत थेट प्रचार सभास्थळी पोहोचणार आहे.यानंतर संत तुकाराम महाराज सभागृह, पाण्याच्या टाकीजवळ, बल्लारपूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेत ओबीसी समाजाच्या घटनात्मक हक्कांचे संरक्षण, आरक्षण टिकविणे आणि सामाजिक न्याय या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
यात्रेच्या स्वागतासाठी बल्लारपूर शहरातील सर्व ओबीसी बांधवांसह विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. आयोजकांच्या मते, ही यात्रा ओबीसी समाजाच्या आरक्षण व घटनात्मक अधिकारांच्या संरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे.
News - Chandrapur




Petrol Price




