जागतिक पर्यावरण दिनानिमीत्त गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम व जनजागृती रॅलीचे आयोजन


- एम.आय.डी.सी. मैदान येथे पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ अधिका-यांच्या हस्ते एकूण २५० वृक्षांची लागवड
- सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर वृक्षारोपण व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाया जनजागृती रॅलीचे आयोजन
- पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभरात एकूण २००० पेक्षा अधिक वृक्षांची लागवड
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : ०५ जून हा दिवस दरवर्षी संपूर्ण जगभरात जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जात असतो. पर्यावरण हे मानवाच्या अस्तित्वाचा मूलभूत आधार आहे. शुद्ध हवा, स्वच्छ पाणी, सुपीक जमीन, वनसंपदा आणि जैवविविधता या सर्व गोष्टी पर्यावरणामूळेच उपलब्ध होतात. या पर्यावरणाचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी असून पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहचविणे तसेच हरित आणि स्वच्छ परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने आज०५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने एम. आय. डी. सी मैदानावर पोलीस अधीक्षक गडचिरोली एम. रमेश यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमास विविध प्रकारच्या फळझाडे व सावलीची झाडे अशी एकूण२५० झाडांची लागवड करण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने दरवर्षी पर्यावरण संवर्धनासाठी विविध उपक्रम राबविले जात असून या वर्षीही वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत एक अधिकारी/अंमलदार - एक वृक्ष या संकल्पनेखाली मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच लावण्यात आलेल्या रोपांची नियमित देखभाल करून त्यांचे संवर्धन करण्यावर भर देण्यात आला. यासोबतच सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावर देखील वृक्षारोपण कार्यक्रमासोबतच पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीदरम्यान पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यासह नागरिकांनी देखील मोठया प्रमाणावर सहभागी होऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
सदर वृक्षारोपण कार्यक्रमास पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी हर्षवर्धन बी. जे., पोलीस उप-अधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. या उपक्रमामूळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती होण्यास मदत होणार असून नागरिकांनीही आपल्या परिसरात अधिकाधिक वृक्ष लागवड करून हरित गडचिरोलीच्या निर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता पोलीस मुख्यालयाचे रापोनि. अनुजकुमार मडामे, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. चंद्रकांत शेळके व पोलीस अंमलदार तसेच सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.
News - Gadchiroli




Petrol Price




