निर्बंध असतानाही आरमाेरी येथे भरला आठवडी बाजार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आरमोरी :
शहरात नगर परिषद कार्यालयासमोर आठवडी बाजार शुक्रवारला भरत असतो. मात्र जिल्ह्यात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता जिल्ह्याधिकारी यांनी ९ मार्चला पत्रक काढून आठवडी बाजार भरविण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यानुसार नगर परिषद प्रशासनाकडुन आरमोरी शहरात आठवडी बाजार भरणार नाही, यासंबंधी वाहनांच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात आले. आरमोरी शहरात आठवडी बाजार भरणार नाही असे लोकांना वाटत असल्याने नागपूर व इतर ग्रामीण भागातून येणारा भाजीपाला आला नाही. त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी उचलला. भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढविल्यामुळे लोकांना जास्त पैसे मोजून भाजीपाला घ्यावा लागला.
आठवडी बाजार भरण्यावर निर्बंध असताना शुक्रवारचा बाजार काही प्रमाणात भरल्याने अनेकांना आश्चर्य वाटायला लागले . नगरपरिषद कार्यालयासमोर आठवडी बाजार भरला असतानाही नगरपरिषद प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली. सुज्ञ नागरिकांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर लगेच सायंकाळी ५ वाजता आठवडी बाजारात फिरून दुकाने बंद करण्यात आली.

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-03-14


Related Photos