दक्षिण नागपूर मतदार संघात बीएलओ व बीएलऐ यांच्यासाठी १ व २ ऑगस्टला शिबीराचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : दक्षिण नागपूर मतदार संघाअंतर्गत शनिवार दिनांक १ ऑगस्ट रोजी तसेच रविवार २ ऑगस्ट रोजी सर्व मतदान केंद्र स्तरावर शाळा/ जवळचे समाजमंदिर अथवा सभागृह येथे बीएलओ आणि पक्षीय बीएलऐ यांचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात वाटप करण्यात आलेले फॉर्म्स भरून जमा करण्यात येणार असून ज्या मतदारांचे पत्ते बीएलओ यांना आढळून आलेले नाहीत अशा अनुपस्थित/ मयत/ स्थलांतरित/ दुबार मतदारांच्या याद्या तयार करून घेऊन त्या सर्वपक्षीय बीएलऐकडून प्रमाणित करून घेण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
याकरीता सर्व राजकीय पक्ष प्रमुख यांची सभा घेण्यात आली असून त्यांचे नियुक्त बीएलऐ यांना शिबिरात उपस्थित राहून बीएलओेंना सहकार्य करण्याबाबत तसेच मतदारांचे पत्ते शोधण्याबाबत मदत करण्याकरिता आवाहन करण्यात येत आहे.
News - Nagpur




Petrol Price




