महत्वाच्या बातम्या

 घाटंजी पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी एस. जे. इसलकर प्रकरणाची पुढील सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात १७ आगस्ट २०२६ रोजी


- अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाकडून साक्षीदारास पुन्हा समन्स जारी

विदर्भ न्युज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / घाटंजी : सन्शयीत आरोपी तथा घाटंजी पन्चायत समितीचे विस्तार अधिकारी (पन्चायत) आणि नेर पन्चायत समितीचे तत्कालीन प्रभारी गट विकास अधिकारी सखाराम जयवन्तराव इसलकर विरुद्ध यवतमाळ येथील लाच लुचपत प्रतिबन्धक विभागाने दाखल केलेल्या प्रकरणाची सुनावणी १७ आगस्ट २०२६ रोजी सोमवारी होत असुन, सदर प्रकरणाचा निकाल लागण्यास काही अवधी बाकी असुन, अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश एस. यु. बघेले (ADDITIONAL SESSION JUDGE S. U. BAGHELE) यांनी साक्षीदारास पुन्हा समन्स बजावला आहे. दरम्यान, या पुर्वीच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील व साक्षीदार अनुपस्थित होते.

घाटन्जी पन्चायत समितीचे वादग्रस्त पन्चायत विस्तार अधिकारी सखाराम जयवन्तराव इसलकर हे नेर पन्चायत समिती मध्ये प्रभारी गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत असतान्ना चिकणी डोमगा येथील अन्गणवाडीच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी सचिव / ग्रामसेवक गणेश सुखदे यान्ना ५,०००रुपयाची लाचेची मागणी केली होती. पैकी २,००० रुपये सखाराम इसलकर यांना नगदी देण्यात आले. नन्तर लाच लुचपत प्रतिबन्धक विभागाने सापळा यशस्वीच्या वेळी ३,००० रुपये देण्यात आले.

या वरून नेर पन्चायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी तथा सद्या कार्यरत घाटन्जी पन्चायत समितीचे विस्तार अधिकारी (पन्चायत) सखाराम जयवन्तराव इसलकर यांचे विरुद्ध लाच लुचपत प्रतिबन्धक विभागाने लाच लुचपत प्रतिबन्धक कायदा कलम ७, १३-१-Dr/W, १३-२ अन्तर्गत नेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणाचा तपास करुन लाच लुचपत प्रतिबन्धक विभागाने यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सन्शयीत आरोपी सखाराम इसलकर विरुद्ध दोषारोपपत्र (CHARGE SHEET) सादर केले. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलम्बित आहे.

तथापि, घाटन्जी पन्चायत समितीमधील काही ग्रामपन्चायत तपासणीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ग्रामपन्चायत सचिवाकडून रक्कम उकलल्याने त्यान्ची जिल्हा परिषद स्तरावरुन व लाच लुचपत प्रतिबन्धक विभागाकडून सखोल चौकशी करून त्यान्चे विरुद्ध कारवाईची मागणी नथ्थु वेट्टी (माजी सरपंच जाम्ब) यान्नी केली आहे.

तसेच कोणत्याही ग्रामपन्चायतीला भेटी न देता, पन्चायत समिती कार्यालयात बसुनच ग्रामपन्चायतला भेटी दिल्याचा खोटा अहवाल तयार केल्याचा, आरोप कवाडे यान्नी केला आहे. दरम्यान, कुर्ली येथील तक्रारदार अयनुद्दीन सोलंकी यांनी केलेल्या लेखी तक्रारीनुसार, घाटन्जी पन्चायत समितीच्या गट विकास अधिकारी वन्दना नानोटे यांनी दिलेल्या निर्देशा नुसार सुद्धा आत्तापावेतो शिरोली ग्रामपन्चायतचा चौकशी अहवालाची प्रत देण्यात आलेली नाही. 

तसेच मुरली ग्रामपन्चायत व मौजा कु-हाड ग्रामपन्चायतच्या चौकशीच्या चौकशी अहवालाची प्रत सुद्धा सम्बधित विस्तार अधिकारी (पन्चायत) यान्नी दिली, नसुन वरिल तिन्ही ग्रामपन्चायतची चौकशी जिल्हा परिषदेच्या सक्षम अधिका-याकडे देण्यात यावे, अशी मागणी घाटन्जी पन्चायत समितीच्या गट विकास अधिकारी वन्दना नानोटे यांच्या कडे तक्रारदार अयनुद्दीन सोलंकी यांनी लेखी तक्रारीतून केली आहे.

कु-हाड व मुरली येथील ग्रामपन्चायत अधिकारी तथा सचिव मन्गेश व्ही. गाऊत्रे (SECRETARY MANGESH V. GAUTRE) यांचेकडून लेखा परिक्षण अहवालानुसार आक्षेपाधीन रक्कम व वसुलपात्र रक्कम  तात्काळ वसुल करुन त्यान्चे विरुद्ध भारतीय न्याय सहिता कलम ३१६ (२), ३१६ (५) व ३१८ (४) अन्वये फौजदारी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सचिव मन्गेश गाऊत्रे विरोधात सखोल चौकशीची मागणी कुर्ली येथील तक्रारदार अयनुद्दीन सोलंकी यांनी शासनाकडे केली आहे. विशेषतः तक्रारदाराने केलेली लेखी तक्रारच माझे बयान असुन, त्या नुसार सखोल चौकशी करुन चौकशी अहवालाची प्रत तात्काळ पुरविण्यात यावे, अशी मागणी तक्रारदार अयनुद्दीन सोलंकी यांनी केली आहे.

मात्र, पन्चायत विभागाचे कोणतेही चौकशीचे व इतर पत्रे हे पन्चायत विभागातील पन्चायत विस्तार अधिकारीच तयार करतात व त्यावर फक्त सही करिता पन्चायत समितीच्या गट विकास अधिकारी (BLOCK DEVELOPMENT OFFICER) यांच्या समक्ष ठेवत असतात, असा आरोप तक्रारदार अयनुद्दीन सोलंकी (कुर्ली ता. घाटन्जी) यांनी केला आहे.

विशेष म्हणजे विस्तार अधिकारी (पन्चायत) एस. जे. इसलकर (घाटंजी) विरुद्ध सखोल चौकशी करुन महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा शिस्त व अपिल नियम १९६४ व १९६७ अन्वये निलम्बनाची (शिस्तभन्गाची) कारवाई करण्याची मागणी जाम्ब येथील माजी सरपन्च नथ्थू वेट्टी, कुर्ली ग्रामपन्चायतच्या ग्रामपन्चायत सदस्या मिराबाई हनमन्तू किणाके व सावरगाव मन्गी येथील ग्रामपन्चायत सदस्य युसूफ पठाण यांनी शासनाकडे केली आहे. तथापि, वादग्रस्त पन्चायत विस्तार अधिकारी सखाराम इसलकर (घाटंजी) यांची यवतमाळ पन्चायत समितीला झालेली बदली जनगणने अभावी तात्पूरती रद्द करण्यात आल्याचे समजते. तसेच त्यान्ची घाटन्जी पन्चायत समिती मधून तात्काळ बदली करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, नेर पन्चायत समितीचे प्रभारी गट विकास अधिकारी आणि घाटन्जी पन्चायत समितीचे (पन्चायत) विस्तार अधिकारी एस. जे. इसलकर प्रकरणाचा काय निकाल लागतो, या कडे घाटन्जी तालुक्यातील नव्हे, तर यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos