चंद्रपुरात अंमली पदार्थांविरोधात एलसीबीचा धडाका : एमडीसह तस्कर अटकेत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरात स्थानिक गुन्हा शाखेने (एलसीबी) अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) ड्रग्जची अवैध विक्री करणाऱ्या एका सराईत आरोपीला रंगेहात अटक केली. या कारवाईत आरोपीच्या ताब्यातून एमडी ड्रग्ज व मोबाईलसह एकूण १ लाख ४४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, ललित उर्फ आर्यन बादल कंजर (वय ३८), रा. कंजर मोहल्ला, जलनगर वॉर्ड, चंद्रपूर हा आपल्या जुन्या राहत्या घरी एमडी ड्रग्ज विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा शाखेला मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने नियोजनबद्ध कारवाई करत संबंधित ठिकाणी छापा टाकला.
आरोपीच्या घराची झडती घेतले असता ९८.९५ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज किंमत ९४ हजार ७५० रुपये आणि ओप्पो रेनो १५ ५जी मोबाईल किंमत ५० हजार रुपये असा एकूण १ लाख ४४ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ (एनडीपीएस कायदा) अंतर्गत कलम ८(क), २२(ब) व २९ अन्वये रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी व अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे, दीपक काँक्रेडवार, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, सुनील गौरकर, सर्वेश बेलसरे, पोलीस हवालदार सतीश अवथरे, इम्रान खान, लालू यादव, संदीप, हिरालाल गुप्ता तसेच पोलीस अंमलदार किशोर वाकाटे, शशांक बदामवार आणि महिला पोलीस अंमलदार छाया यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




