महत्वाच्या बातम्या

 भद्रावती बसस्थानकावर अल्पवयीनाकडून एमडी ड्रग्ज जप्त : ५.२१ ग्रॅम अमली पदार्थासह ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती शहरातील बसस्थानक परिसरात अमली पदार्थविरोधी कारवाई करत पोलिसांनी १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ५.२१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज पावडर आणि एक रिअलमी कंपनीचा मोबाईल असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी भद्रावती पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त बातमीदाराकडून भद्रावती बसस्थानक परिसरात एक मुलगा एमडी ड्रग्ज विक्रीसाठी बाळगून असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी पंचांसमक्ष सापळा रचून संशयित विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५.२१ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज पावडर तसेच रिअलमी कंपनीचा मोबाईल आढळून आला. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत २३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी अपराध क्रमांक ७०२/२०२६ अन्वये एनडीपीएस कायद्याच्या कलम ८(क), २२(ब), २९ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ९५ अंतर्गत भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेंद्र केदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा, पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर, सहाय्यक फौजदार महेंद्र बेसरकर, पोलीस हवालदार अनुप आष्टुनकर, पोलीस हवालदार गोपाल आतकुरवार, पोलीस अंमलदार खुशाल कावडे, पोलीस अंमलदार संतोष राठोड, पोलीस अंमलदार योगेश घाटोळे तसेच चालक पोलीस अंमलदार यांनी संयुक्तपणे पार पाडली.





  Print






News - Chandrapur




Related Photos