आता बियाणे, खते व किटकनाशके विक्री परवाणा काढता येणार घरबसल्या

- आपले सरकार पोर्टलवरुन ऑनलाईन सुविधा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : जिल्ह्यातील नवीन कृषि पदवीधारक आणि विद्यमान कृषि सेवा केंद्र चालकांना आता बियाणे, खते, किटकनाशके आणि कापूस बियाणे विक्री परवाने मिळवणे, परवान्यांचे नुतणीकरण करणे किंवा त्यात सुधारणा करणे अत्यंत सोपे झाले आहे. ही सर्व प्रक्रिया आता आपले सरकार पोर्टलवरुन घरबसल्या ऑनलाईन पूर्ण करता येणार आहे.
ज्या कृषि सेवा केंद्र चालकांनी अद्याप आपल्या परवान्यांचे नूतणीकरण केलेले नाही किंवा खते, बियाणे, किटकनाशके यांचा समावेश करुन परवान्यात सुधारणे बाकी आहे. अशा सर्व परवानाधारकांनी आपले परवाने १५ दिवसात घरबसल्या ऑनलाईन अद्यावत करुन घ्यावे. अद्यावत न केल्यास संबंधीत कृषि केंद्रावर कृषि विभागाकडून कारवाई करण्यात येईल.
नविन बियाणे परवाना काढण्यासाठी कापूस बियाण्याकरीता ५०० रुपये व इतर बियाण्याकरीता १ हजार रुपये, नविन खते किरकोळ विक्री परवाना करीता ४५० रुपये, नवीन खते घाऊक विक्री परवाणा २ हजार २५० रुपये, किटकनाशके विक्री परवाना ७ हजार ५०० रुपये, बियाणे विकी परवाना दुरुस्ती कापूसकारीता १०० रुपये व इतर बियाण्याकरीता ५०० रुपये, खते विक्री परवाना किरकोळ ३० रुपये व घाऊक १५० रुपये किटकनाशके विक्री परवाना करीता ३०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.
शुल्क ऑनलाईन प्रणालीद्वारे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे नावे भरल्यानंतर चलन आपले सरकार पोर्टलवर अपलोड करावे लागेल, असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.
News - Wardha




Petrol Price




