उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना कोरोनाची लागण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / उत्तराखंड :
वादग्रस्त विधानांनी चर्चेत आलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सोमवारी ट्वीट करत तीरथ सिंह रावत यांनी याची माहिती दिली आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी स्वत: क्वारंटाइन राहण्याचा निर्णय घेतला आहे.
तीरथ सिंह रावत यांनी सोमवारी सकाळी ट्वीट करून माहिती दिली आहे, 'माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी ठीक आहे आणि मला कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. डॉक्टर्सच्या देखरेखीत मी विलगीकरणाचा निर्णय घेतला आहे. तसेच माझ्यासंपर्कात आलेल्यांनी तपासणी करून घ्या, कृपया सावधान रहा.'
तीरथ सिंह रावत नुकतेच कुंभमेळ्यात सहभागी होते आणि संतांच्यासोबत पूजेतही त्यांनी सहभाग घेतला होता. सोबतच रविवारी देखील त्यांनी एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
उत्तराखंडमध्ये सध्या कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येत आहे. शाही स्नानाने कुंभमेळ्याची सुरुवात झाली होती, मात्र देशात पुन्हा एकदा कोरोना संकट गडद झाले आहे. केंद्रीय टीमने उत्तराखंड सरकारला कोरोना नियमांचे पालन सक्तीने करा असे आदेश दिले होते.
तीरथ सिंह रावत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांनी सर्वात पहिले कुंभमेळ्यासाठी नियमांमध्ये ढील दिली होती आणि कोरोना निगेटिव्ह रिपोर्टची आवश्यकता हटवली होती.
  Print


News - World | Posted : 2021-03-22


Related Photos