जागेच्या वादातून दाम्पत्यावर हल्ला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील सिंधीपार/मुंडी येथे घराच्या वरणीच्या जागेच्या जुन्या वादातून दाम्पत्यावर लाकडी काठीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी लाखनी पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत संतोष बक्षी दिघोरे ३५, वर्ष रा. सिंधीपार/मुंडीयांनी लाखनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास घराच्या वरणीच्या जागेवरून सुरू असलेल्या जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर शत्रुघ्न नामदेव टेंभुर्णे ५० वर्ष व नलिनी शत्रुघ्न टेंभुर्णे ४५ वर्ष यांनी घराची पाल फाडल्याच्या कारणावरून संतोष दिघोरे यांच्याशी वाद घातला.
वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. तक्रारीनुसार, दोन्ही आरोपींनी संगनमत करून लाकडी काठीने संतोष दिघोरे यांच्या डोक्याजवळ मारहाण केली. या हल्ल्यात त्यांना दुखापत झाली. त्यानंतर संतोष दिघोरे यांच्या पत्नीलाही लाकडी काठीने हातावर मारहाण करून जखमी करण्यात आले.
यावेळी आरोपींनी दाम्पत्याच्या मुलांनाही मारहाण केल्याचा तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घटनेनंतर जखमींनी लाखनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
पोलिसांनी संतोष दिघोरे यांच्या तक्रारीवरून शत्रुघ्न नामदेव टेंभुर्णे व नलिनी शत्रुघ्न टेंभुर्णे यांच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
News - Bhandara




Petrol Price




