महत्वाच्या बातम्या

 अनुसूचित जाती, नवबौध्द घटकातील लाभार्थ्यांसाठी स्टँड अप इंडिया योजना


- १ लाख २५ हजार उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट १५ टक्के मिळणार सबसिडी

विदर्भ न्युज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : केद्र शासनाच्यावतीने स्टँडअप योजनेंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त अनुसूचित जाती, जमातीचे १ लाख २५ नवउद्योजक व तितक्याच महिला उद्योजिका निर्माण करण्यासाठी मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेचा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे करण्यात येत आहे. जयंती वर्षानिमित्त केंद्र शासनाने स्टॅंडअप इंडीया ही योजना घोषित केली आहे. या योजनेंतर्गत १ लाख २५ हजार अनुसूचित जाती, जमातीचे उद्योजक आणि १ लाख २५ हजार महिला उद्योजिका निर्माण करण्याचे उदिष्ट केंद्र शासनाने ठरविले आहे. यासाठी केंद्र शासनाने १० हजार कोटीची तरतुद केली आहे.

योजनेंतर्गत संबंधित लाभार्थ्यांना त्यांचा स्वहिस्सा म्हणुन एकुण प्रकल्प किंमतीच्या २५ टक्के रक्कम द्यावयाची आहे. योजनेंतर्गत अनुसूचित जातीसाठीच्या सवलती घेण्यास पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक लाभार्थ्यांची मार्जीन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक लाभार्थ्यांना एकुन प्रकल्प किमतीच्या लाभार्थी हिस्यातील २५ टक्के मधील जास्तीत जास्त १५ टक्के मार्जीन मनी उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील नवउद्योजक यांना १० टक्के हिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅंडअप इंडीया या योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजुर केल्यानंतर उर्वरीत १५ टक्के सबसिडी राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांनी आयुक्त, समाज कल्याण पुणे यांच्या नावे अनुदानासाठी मागणी विहीत केलेल्या विवरण पत्रात तीन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत उद्योग आधार नोंदणी पत्र आणि जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. बँकेचे कर्ज मंजूरी पत्र आयुक्त, समाज कल्याण पुणे यांना सादर करणे आवश्यक आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सबसिडी समाज कल्याण आयुक्तालयाकडून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल, असे समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्तांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos