महत्वाच्या बातम्या

 घुग्घुसमध्ये सुगंधित पानमसाल्यावर एफडीएची धडक कारवाई : ४० हजारांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अन्न व औषध प्रशासन एफडीए चंद्रपूरने घुग्घुस येथे प्रतिबंधित सुगंधित पानमसाल्याचा साठा करून विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत सुमारे २१.९५६ किलो प्रतिबंधित पानमसाला जप्त केला. या कारवाईत ४० हजार ९३५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफडीएच्या पथकाने १२ जुलै २०२६ रोजी घुग्घुस येथील मातादेवी रोड, गोयंका शाळेजवळील लेबर कॅम्प परिसरातील राहत्या घरावर छापा टाकला. यावेळी प्रसाद मारोती दुर्गे ४८ वर्ष व जीवन हगरुजी भैसारे ४८ वर्ष  यांच्या ताब्यातून विमल, व्ही-१, राजश्री व डबल ब्लॅक या विविध ब्रँडचा प्रतिबंधित सुगंधित पानमसाला जप्त करण्यात आला.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध घुग्घुस पोलीस स्टेशन येथे बीएनएस कलम १२३, २२३, २७४ व २७५ अन्वये एफआयआर क्रमांक ०२२६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई सहआयुक्त अन्न के. आर. जयपूरकर, नागपूर तसेच सहाय्यक आयुक्त अन्न पी. ए. उमाप, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी उमेश एम. कपगते यांनी ही कारवाई केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos