बंगाली मतूआ धर्मीय समाजातील मनोज बार व सुमित्रा बार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / आलापल्ली : आलापल्ली येथे बंगाली मतूआ धर्मीय समाजातील सदस्य मनोज बार आणि सुमित्रा बार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून त्यांचे स्वागत केले.
यावेळी पक्षाच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त करत समाजाच्या विकासासाठी पक्षासोबत कार्य करण्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या प्रवेशामुळे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




