महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेत गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने प्रवेश


- समाजातील शेवटच्या घटकांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी कार्य करणार : डॉ. प्रणय खुणे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : समाजातील गोरगरीब, वंचित आणि दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्याला गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात नव्या उमेदीने सुरुवात झाली आहे. दोन्ही जिल्ह्यांतील विविध तालुक्यांमध्ये सामाजिक कार्य करणारे नागरिक, युवक-युवती आणि समाजसेवकांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेत सहभाग नोंदविला आहे.

११ जुलै २०२६ रोजी गडचिरोली येथील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, प्रदेश महासचिव डॉ. प्रकाश गेडाम आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारत खटी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी संघटनेत प्रवेश केला.

महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष भूषणा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या प्रवेश कार्यक्रमात विविध तालुक्यांतील युवक-युवती व सामाजिक क्षेत्रात कार्यरत नागरिकांनी संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न सोडविणे, त्यांना न्याय व अधिकार मिळवून देणे आणि मानवाधिकारांबाबत जनजागृती करणे हा संघटनेचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजातील शेवटच्या घटकातील गोरगरीब नागरिकांना त्यांचे न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी संघटना सातत्याने कार्य करणार आहे. नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावी प्रयत्न केले जातील.

तसेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील संघटनेच्या जुन्या कार्यकारिण्या लवकरच बरखास्त करून नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. प्रणय खुणे यांनी दिली.

या कार्यक्रमाला महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मनीषा मडावी, स्नेहा मेश्राम, राणी गोपशेट्टीवार, जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, संघटन नेते प्रवीण गेडाम, पदाधिकारी दिनेश मुजुमदार,पलाश घरामी, राजू सातपुते, संदीप भोवरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवीन सदस्यांच्या सहभागामुळे गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मानवाधिकार संरक्षणाचे कार्य अधिक व्यापक होणार असून सामाजिक न्यायाच्या चळवळीला बळ मिळणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos