पॉश कायद्यांतर्गत भंडारा जिल्ह्यात ८४१ आस्थापनांची तपासणी सुरू


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी लागू असलेल्या पॉश कायदा, २०१३ अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील १८९ शासकीय आणि ६५२ खासगी अशा एकूण ८४१ आस्थापनांची विशेष तपासणी सुरू करण्यात आली आहे. जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाने १५ जूनपासून ही मोहीम हाती घेतली असून, आतापर्यंत ५० आस्थापनांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी, औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक, आरोग्य, वित्तीय आणि सेवा क्षेत्रातील आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती (ICC) स्थापन करणे कायद्याने बंधनकारक आहे.
तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी समित्या केवळ कागदोपत्री असल्याचे, त्यांची माहिती अद्ययावत नसल्याचे तसेच पॉश कायद्याच्या तरतुदींचे योग्य पालन होत नसल्याचे आढळून आल्याने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तपासणीत उणीवा आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
News - Bhandara




Petrol Price




