महत्वाच्या बातम्या

 २० जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : महिलांचा समस्यांचे निराकरण व्हावे व त्यांच्या समस्यांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येत आहे.

समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे या हेतुने जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या तिसरा सोमवार व तालुकास्तरावर तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. महिलांचा कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तिक समस्या, गाऱ्हाणी, अडी अडचणी ऐकुण त्यांचे लेखी अर्ज स्विकारण्यात येईल.

न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवा विषयक व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले किंवा आवश्यक कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकृत करण्यात येणार नाही, कृपया याची नोंद घ्यावी. तसेच अर्ज हे वैयक्तिक स्वरुपाचे असावेत व अर्ज आवश्यक कागदपत्रासह तीन प्रतीत सादर करावे. अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, बॅरेक क्रमांक १, खोली क्रमांक २६, २७ कॉम्पलेक्स, गडचिरोली या कार्यालयात नि:शुल्क प्राप्त होईल.

२० जुलै २०२६ रोजी सोमवारी, सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे कार्यालयातील सभागृहात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पिडीत समस्याग्रस्त महिलांनी आपले अर्ज सदर कार्यालयात सादर करावे, याबाबत सर्व महिलांनी नोंद घ्यावी असे आवाहन सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos