महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


२७ जून महत्वाच्या घटना

१९५० : अमेरिकेने कोरियन युद्धात आपले सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला.

१९५४ : अणुशक्तीवर चालणारे जगातील पहिले विद्युत केंद्र मॉस्कोजवळ ओब‍निन्स्क येथे सुरू झाले.

१९७७ : जिबुटी फ्रान्सपासून स्वतंत्र झाले.

१९९१ : युगोस्लाव्हियाने स्लोव्हेनियावर आक्रमण केले.

१९९६ : अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे यांना महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा सन्मान.

२०२२ : मुंबईत चार मजली निवासी इमारत कोसळून किमान १९ लोकांचे निधन.

२०२२ : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन कंपनीच्या ४ लोकांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन.

२०२२ : मंकीपॉक्स या रोगामुळे पहिले निधन झाल्याची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने प्रमाणित केले.

२०१४ : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड पाइपलाइन स्फोट - भारतातील आंध्र प्रदेश मध्ये झालेल्या स्फोटात किमान १४ लोकांचे निधन.

२०१३ : इंटरफेस रीजन इमेजिंग स्पेक्ट्रोग्राफ - नासाचे स्पेस प्रोब सूर्याचे निरीक्षण करण्यासाठी प्रक्षेपीत.

१९८२ : स्पेस शटल कोलंबिया - नासाचे अतंराळयान अंतिम संशोधन आणि विकास उड्डाण मोहिमेसाठी प्रक्षेपित.

१९७३ : उरुग्वे या देशाच्या अध्यक्ष जुआन मारिया बोर्डाबेरी यांनी संसद विसर्जित करून हुकूमशाही प्रस्थापित केली.

१९४६ : कॅनडा देशाच्या संसदेने कॅनडाच्या नागरिकत्वाची व्याख्या स्थापित केली.

१९४१ : रोमानियन अधिकार्‍यांनी किमान १३,२६६ ज्यू लोकांची हत्या केली. हा इतिहासातील सर्वात हिंसक घटना आहे.

१९४१ : दुसरे महायुद्ध - ऑपरेशन बार्बरोसा: दरम्यान जर्मन सैन्याने बियालिस्टोक शहर काबीज केले.

२७ जून जन्म

१४६२ : फ्रान्सचा राजा लुई (बारावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ जानेवारी १५१५)

१५५० : फ्रान्सचा राजा चार्ल्स (नववा) यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे १५७४)

१८३८ : बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १८९४)

१८६४ : काळ या साप्ताहिकाचे संपादक शिवराम महादेव परांजपे याचं जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर १९२९)

१८६९ : नोबेल पारितोषिक विजेते जर्मन प्राणीशास्त्रज्ञ हॅन्स स्पेमन यांचा जन्म.

१८७५ : दत्तात्रेय कोंडो घाटे ऊर्फ कवी दत्त यांचा जन्म. (मृत्यू: १३ मार्च १८९९)

१८८० : अंध-मूकबधिर असूनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका शिक्षिका हेलन केलर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९६८)

१८९९ : पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेज चे स्थापक जुआन पेप्पे यांचा जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १९८१)

१९१७ : आक्रमक डावखुरे फलंदाज खंडू रांगणेकर यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १९८४)

१९३९ : संगीतकार राहुलदेव बर्मन तथा पंचमदा यांचा जन्म. (मृत्यू: ४ जानेवारी १९९४)

१९६२ : भारतीय-कॅनडातील उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१४)

१९९२ : भारतीय चित्रपट अभिनेत्री कार्तिका नायर यांचा जन्म

१९६२ : भारतीय-कॅनेडियन उद्योगपती सुनंदा पुष्कर यांचा जन्म (मृत्यू : १७ जानेवारी २०१४)

१९५७ : अंतराळात जाणारे पहिले अरब आणि पहिले मुस्लिम सुलतान बिन सलमान अल सौद यांचा जन्म

१९४३ : भारतीय अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रवी बत्रा यांचा जन्म

१९१९ : भारतीय नृत्यांगना अमला शंकर यांचा जन्म (मृत्यू : २४ जुलै २०२०)

२७ जून मृत्यू

१७०८ : मराठा साम्राज्यातील सेनापती धनाजी जाधव यांचे निधन.

१८३९ : शिखांच्या राज्याचे पराक्रमी संस्थापक रणजितसिंग यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १७८०)

१९९६ : जेम्स बाँड चित्रपटांचे निर्माते अल्बर्ट आर. ब्रोकोली यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९०९)

१९९८ : सिक्कीमचे पहिले राज्यपाल होमी जे. एच. तल्यारखान यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९१७)

२००० : शिक्षणतज्ञ व चरित्रकार द. न. गोखले यांचे निधन.

२००२ : भारतीय उपराष्ट्रपती कृष्णकांत यांचे निधन.

२००८ : फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९१४)

२०१४ : हैती देशाचे ४३वे राष्ट्राध्यक्ष, शिक्षणतज्ज्ञ आणि राजकारणी लेस्ली मनीगाट यांचे निधन (जन्म: १६ ऑगस्ट १९३०)

१९५७ : फ्रिट्झ विंटरस्टेलर, मार्कस श्मक, कर्ट डिमबर्गर यांच्या सोबत ब्रॉड शिखर पहिल्यांदा चढणारे ऑस्टीयन गिर्यारोहक हर्मन बुहल यांचे निधन (जन्म: २१ सप्टेंबर १९२४)





  Print






News - todayspecialdays




Related Photos