आयुष्मान भारत कार्ड नोंदणीसाठी मिशन मोड वर काम करा : जिल्हाधिकारी वान्मथी सी

- आरोग्यविषयक विविध समित्यांचा आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : प्रधानमंत्री आयुष्मान भारत जनआरोग्य योजनेंतर्गत पाच लाखापर्यंतचे उपचार विनामुल्य केले जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान भारत कार्ड काढणे आवश्यक आहे. त्यामुळे कार्ड नोंदणीची मोहिम जिल्ह्यात मिशन मोडवर राबवा. जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांना या योजनेच्या कक्षेत आणा, असे निर्देश जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिले.
जिल्हाधिकारी वान्मथी सी यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या विविध समित्यांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील बेले, जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. जगदीश बुकतरे, कुष्ठरोगचे सहाय्यक संचालक डॉ. रा. ज. पराडकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हेमंत पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मिशन एड्स सुरक्षा, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध समिती, एचआयव्ही टीबी समिती, डिसीआरजी, रुग्ण कल्याण समिती, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम, पीसीपीएनडीटी, एमजेपीजेवाय व क्षयरोग नियंत्रण विभागाचा सविस्तर आढावा घेतला.
आयुष्मान कार्ड नोंदणीचे जिल्ह्याचे प्रमाण वाढले पाहिजे, त्यासाठी गावस्तरावर आशा, अंगणवाडी सेविकांची मदत घेऊन तीन ते चार दिवसांची विशेष मोहिम राबवा. एकही पात्र कुटुंब नोंदणीपासून वंचित राहू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. एड्स नियंत्रणासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात विशिष्ठ गटानुसार तपासणी करुन जास्तीत जास्त पीएलएचआयव्ही शोधण्यास यावे.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागृती केली जावी. ठिकठिकाणी अचनाक भेटी देऊन तंबाखुजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर पोलिस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागासोबत पोटपा अंतर्गत कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हास्तरीय संसर्गजन्य व प्राणिजन्य आजार प्रतिबंध व नियंत्रण समितीचा आढावा घेतांना पावसाळी परिस्थिती लक्षात घेता दूषित पाणीपुरवठा, कीटकजन्य आजार आणि प्राण्यांमार्फत मानवामध्ये पसरणाऱ्या आजारांवर लक्ष ठेवावे. आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागांनी संशयास्पद रुग्ण व प्राण्यांमधील आजारांची माहिती तात्काळ एकमेकांसोबत सामायिक करावी. डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि चिकनगुनियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व औषध फवारणी करावी. दुर्गम भागात पशुधनाचे विविध आजारांविरोधी लसीकरण करून घ्यावे, असे निर्देश दिले.
बैठकीला अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नलीनी विखे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या पवार, डॉ.विनित झळके, डॉ.प्रशांत वाडीभस्मे, डॉ.संजय गाठे, डॉ.आशिष लांडे, डॉ.पल्लवी खेडीकर, डॉ.वरभे, डॉ.मोहीता कोडापे, नुरुल हक शेख, डॉ.नम्रता सलुजा, कांचन बडबाने, डॉ.स्मिता हिवरे, शमा खान, मनिष कुटे, सुमंत ढोबळे आदी उपस्थित होते.
News - Wardha




Petrol Price




