आरमोरी येथे सट्टापट्टी जुगारावर पोलिसांचा छापा : एक जण ताब्यात, मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / आरमोरी : स्थानिक बर्डी परिसरात सट्टापट्टी नावाचा जुगार खेळविणाऱ्या एका इसमावर आरमोरी पोलिसांनी सोमवारी (२२ जून) दुपारी ४ वाजताच्या सुमारास अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी आरोपीला रंगेहात ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
गोपाल लक्ष्मण तुपट असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, आरमोरी येथील बर्डी परिसरात विनापरवाना सट्टापट्टी नावाचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दुपारी ४ वाजताच्या सुमारास घटनास्थळावर अचानक छापा टाकला. या छाप्यात आरोपी गोपाल तुपट हा जुगाराचे साहित्य बाळगून सट्टापट्टी खेळविताना आढळून आला.
पोलिसांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण १ हजार ५०३ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार लखन मामूलकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरमोरी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास आरमोरी पोलीस करीत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




