पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : नुकत्याच जाहीर झालेल्या विविध शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. CBSE, JEE-Mains, JEE-Advanced, MH-CET तसेच Nursing CET परीक्षांमध्ये उत्तम गुण मिळवून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात CBSE १२ वी परीक्षेत ९५% गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम आलेल्या अमेय जोशी याचे विशेष कौतुक करण्यात आले. अमेयने JEE-Mains परीक्षेत ९९ पर्सेंटाईल मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली असून JEE-Advanced परीक्षेतही त्याने यश मिळवले आहे. तसेच MH-CET (PCM) मध्ये त्याने ९९.८० पर्सेंटाईल गुण प्राप्त करून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी त्याच्या सातत्यपूर्ण यशाबद्दल अभिनंदन केले.
श्रीती गोडसेलवार हिने MH-CET (PCM) परीक्षेत ९९.९८ पर्सेंटाईल गुण मिळवून अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. प्रियल घराते हिने MH-CET (PCB) मध्ये ९९.१८ पर्सेंटाईल गुण मिळवले असून Nursing CET मध्ये ९९.६८ पर्सेंटाईल मिळवत आपल्या कॅटेगरीत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. तिच्या या यशाचे पोलिस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले.
खुशबू कोल्हे हिने JEE-Advanced परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवत IIT गांधीनगर येथे प्रवेश मिळवला आहे. याशिवाय इतर गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. त्यामध्ये तन्मय किरंगे (१२ वीमध्ये ९०% व MH-CET मध्ये ९८.७६ पर्सेंटाईल), तुषार ताकसांडे (१२ वीमध्ये ९०% व MH-CET मध्ये ९७.३६ पर्सेंटाईल), ध्रुव मडावी (MH-CET मध्ये ८८ पर्सेंटाईल व JEE-Advanced पात्र), पूर्वा काटे (९८ पर्सेंटाईल), कीर्ती मरसकोल्हे (९१.२० पर्सेंटाईल), निधी बारपात्रे (९०.४० पर्सेंटाईल Nursing CET), मानसी रायपुरे (९६.५८ पर्सेंटाईल), अंशुल हरशे (९४.५६ पर्सेंटाईल), सम्रादनी करकाडे (९४.४० पर्सेंटाईल Nursing CET), धनश्री नींबोरकर (९० पर्सेंटाईल Nursing CET), तसेच सुचिता मुळे, ओम धोटे, सार्थक महाजन आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता.
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामागे डॉ. ए. व्ही. एस. शर्मा आणि नितेश किटे (बालाजी & NSPC) यांचे मार्गदर्शन असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनीही दोन्ही मार्गदर्शकांचे विशेष कौतुक करून त्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच मार्गदर्शक शिक्षकांना दिले. हा सत्कार सोहळा अत्यंत प्रेरणादायी ठरला असून विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे महत्त्व अधोरेखित करणारा ठरला.
News - Gadchiroli




Petrol Price




