गोवंश तस्करीचा डाव उधळला : बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे तीन बैलांची सुटका

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : शहरात गोवंशाची अवैध तस्करी करण्याचा प्रयत्न बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हाणून पाडण्यात आला. कार्यकर्त्यांनी संशयित मालवाहू जीपचा पाठलाग करून ती वडसा टी-पॉइंटजवळ अडवली. या कारवाईत जीपमध्ये क्रूरपणे कोंबून नेण्यात येत असलेल्या तीन मोठ्या बैलांची सुटका करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू जीप (क्र. एमएच ३३ टी-७४३५) मधून गोवंशीय गुरांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कार्यकर्त्यांनी तत्काळ जीपचा पाठलाग सुरू केला. काही अंतरापर्यंत पाठलाग केल्यानंतर वडसा टी-पॉइंटजवळ संबंधित वाहन अडवण्यात यश आले.
वाहनाची तपासणी केली असता, त्यामध्ये तीन मोठे बैल अत्यंत क्रूरपणे कोंबून ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे जनावरांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. कार्यकर्त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.
यावेळी वाहन चालकाने आपले नाव रोशन नामदेव पाथ्रीकर वनखी असे सांगितले. या प्रकरणी अमनसिंग गहेरवार यांच्या फिर्यादीवरून संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या कारवाईमुळे गोवंश तस्करीचा डाव उधळण्यात यश आले असून, तीन बैलांना जीवदान मिळाल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




