महत्वाच्या बातम्या

 लाखनीत अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त : ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / लाखनी : लाखनी पोलीस विभागाच्या फिरत्या पथकाने अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत वाहनासह रेतीचा साठा जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (१६) सकाळी सुमारे ८.३० वाजताच्या सुमारास मौजा सालेभाटा गावाकडून खेडेपार गावाजवळील टी-पॉईंट परिसरात करण्यात आली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा युवा टेक्नो प्लस ४७५ डीआय ट्रॅक्टर (क्र. एमएच-३६ एआर-०३७१) आणि विनाक्रमांकाची लाल रंगाची ट्रॉली रेतीने भरलेल्या अवस्थेत आढळून आली. वाहनाची तपासणी केली असता रेती वाहतुकीसाठी आवश्यक असलेली रॉयल्टी किंवा कोणतेही वैध कागदपत्र चालकाकडे नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ही वाहतूक विनारॉयल्टी असल्याचे निष्पन्न झाले.

सदर ट्रॅक्टर निलागोंदी येथील सुनील धनराज हटवार यांच्या मालकीचा असल्याचे समोर आले असून, चालक संजीव माणिकराव परतेके हा वाहन चालवत होता.

पोलिसांनी पंचनामा करून सुमारे एक ब्रास रेती, ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा एकूण ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ट्रॅक्टरची किंमत ७ लाख रुपये, ट्रॉलीची १ लाख रुपये तर रेतीची किंमत ६ हजार रुपये असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास लाखनी पोलीस करीत आहेत.





  Print






News - Bhandara




Related Photos