जागतिक योग दिन २१ जून रोजी : वर्धामध्ये भव्य आयोजन, नागरिकांना सहभागाचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वर्धा जिल्ह्यात जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, माय भारत केंद्र, विविध शैक्षणिक संस्था, शाळा व कनिष्ठ महाविद्यालये, एनसीसी, स्काऊट-गाईड, पतंजली योग सांस्कृतिक चिकित्सालय, जिल्हा योग संघटना तसेच जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिक, क्रीडा प्रेमी, खेळाडू तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शारीरिक आणि मानसिक तसेच आध्यात्मिक विकासासाठी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन योगाचा व्यापक प्रसार, जनजागृती आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने फिट इंडिया मुव्हमेंट अंतर्गत हा जागतिक योग दिन साजरा करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम २१ जून रोजी सकाळी ६.१५ वाजता तालुका क्रीडा संकुल, आयटीआय टेकडी जवळ, वर्धा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री तसेच विविध लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
योग दिन कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांनी योग मॅटसह वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
News - Wardha




Petrol Price




