सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल १८ जून रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

- जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार विभागाचे राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल गुरुवार, १८ जून २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसह विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
दौऱ्यानुसार सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल यांचे गडचिरोली येथे दुपारी ३ वाजता आगमन व नियोजन भवनात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. रात्री सोयीनुसार गडचिरोलीहून रामटेककडे प्रयाण.
News - Gadchiroli




Petrol Price




