महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु तसेच ०२ चारचाकी वाहनांसह  एकूण २२,९९,४००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त


- ०२ वेगवेगळ्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा, पोस्टे गडचिरोली व पोस्टे आष्टी पोलीसांनी पार पाडली कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री करणा¬­यावर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन ३०/०७/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे गडचिरोली पोलीस यांनी तसेच ३१/०७/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे आष्टी पथकाने दोन ठिकाणी सापळा रचून अवैद्य देशी-विदेशी दारूची वाहतूक करणा¬­या आरोपींविरुध्द कारवाई केलेली आहे.

सविस्तर वृत असे आहे की, ३०/०७/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळाली की, इसम नामे प्रमोद भोयर, ३३ वर्षे, रा. गोकूलनगर, ता. गडचिरोली, जि. गडचिरोली याने त्याच्या साथिदारांसह पांढ­या रंगाची मारुती सूझूकी बलेनो कंपनीची चारचाकी वाहन क्र. एम. एच. ३३ ए डि ३१९२ हे आरमोरी कडून गडचिरोली च्या दिशेने अवैद्यरित्या देशी-विदेशी दारूची वाहतुक करीत आहे.

अशा मिळालेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे गडचिरोली येथील पथकाने आरमोरी रस्त्यावर तात्पूरता अडथळा निर्मान करून नाकाबंदी केली असता संशयीत वाहन क्र. एम. एच. ३३ ए. डि. ३१९२ येतांना दिसून आल्याने वाहनाला थांबवून पोलीस पथकाने वाहनातील इसमांना त्यांचे नाव विचारले असता, त्यांनी आपले नाव १) प्रमोद दिलीप भोयर, ३३ वर्षे, रा. गोकुलनगर, ता. गडचिरोली जि. गडचिरोली व २) मुकेश प्रकाश बोधलकर, ३८ वर्ष रा. गोकुलनगर, ता. गडचिरोली जि. गडचिरोली असे सांगितले. 

यानंतर पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, सदर चारचाकी वाहनांमध्ये १) २ लिटर मापाचे रॉयल स्टॅग ३० नग एकूण किंमत १,२०,०००/- रुपये २) एका खाकी रंगाच्या बॉक्समध्ये ९० मिली मापाचे रॉकेट देशी दारू संत्रा १०० नग निपा प्रति बॉक्स असे एकुण १४ बॉक्स प्रमाणे एकूण किंमत १,१२,०००/- रुपये ३) एका खाकी रंगाच्या बॉक्स मध्ये १८० एम.एल मापाचे सह्रांद्री गोल्ड प्रिमियम विस्की ४८ नग काचेच्या निपा एकूण किंमत १४,४००/- रुपये,४) एका खाली रंगाच्या बॉक्स मध्ये १८० मिली मापाचे ऑल सिजन डबल कॅश कनेक्शन रिर्जव्ह विस्की कंपनीचे ४८ नग काचेच्या निपा असे एकूण किंमत १४, ४००/- रुपये ५) १ चारचाकी वाहन जुनी वापरती सुझुकी बलेनो कंपनीची चार चाकी वाहन क्रमाक एम. एच ३३ ए. डी. ३१९२ अंदीजी  किंमत ५,००,०००/- रुपये असा एकूण ७,६०,८००/- रुपयांचा देशी-विदेशी दारुचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला आहे.

संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. १०३८/२०२६ कलम ६५ (अ), कलम ९८, ८३ म.दा.का अन्वये आरोपी नामे १) प्रमोद दिलीप भोयर, ३३ वर्षे, रा. गोकुलनगर, ता. गडचिरोली जि. गडचिरोली २) मुकेश प्रकाश बोधलकर, ३८ वर्ष रा. गोकुलनगर, ता. गडचिरोली जि. गडचिरोली यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. दिपक दादाराव मोहिते, पोस्टे गडचिरोली हे करीत आहेत. तसेच काल ३१/०७/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली यांना गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळाली की, इसम नामे अब्दुल फरहान शेख  २४ वर्ष, रा. जलनगर ता. जि. चंद्रपुर हा चारचाकी वाहन क्र. एम. एच. ३४ बि. झेड. ७६१७ व्दारे पोस्टे आष्टी हद्दीत अवैद्यरित्या देशी-विदेशी दारूची वाहतुक करणार आहे.  

अशा मिळालेल्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे आष्टी येथील पोलीस पथकाने मौजा येणापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील, आंबेडकर स्मारकाजवळ तात्पूरता अडथळा निर्मान करून पांढ­या रंगाची महिंद्रा बोलेरो पिक अप संशयीत वाहन क्र. एम. एच. ३४ बि. झेड. ७६१७ येतांना दिसून आल्याने वाहनाला थांबवून पोलीस पथकाने वाहनातील इसम याला त्याचे नाव विचारले असता, त्यांनी आपले नाव १) अब्दुल फरहान शेख २४ वर्ष, रा. जलनगर ता. जि. चंद्रपुर असे सांगितले. 

यानंतर पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, सदर चारचाकी वाहनांमध्ये १) ९० मिली मापाचे देशी दारु ३००० नग प्रमाणे एकूण किंमत २,४९०,०००/- रुपये २) ०२ लिटर मापाचे ९६ नग रॉयल स्टॅग कंपनीचे एकुण किंमत ३,८४०००/- रुपये, ३) ०२ लिटर मापाचे ३० नग इंपिरियल ब्ल्यु कंपनीचे एकुण किंमत १,०५०००/- रुपये, ४) ५०० मिली मापाचे हायवर्ड ५००० कंपनीचे ९६० नग एकुण किंतम २,८८,०००/- रुपये ५) ५०० मिली मापाचे बडवाईसर मॅग्नम कंपनीचे ७२ नग एकुण किंमत २१,६००/- रुपये, ६ १ चारचाकी वाहन जुनी वापरती महिंद्रा बोलेरो पीक अप कंपनीची चार चाकी वाहन क्र. एम. एच. ३४ बि. झेड. ७६१७ अंदाजे किंमत ५,००,०००/- रुपये असा एकूण १५,३८,६००/- रुपयांचा देशी-विदेशी दारुचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला आहे.

संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे आष्टी येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. ०२२६/२०२६ कलम ६५ (अ), कलम ९८ म.दा.का अन्वये आरोपी नामे १) अब्दुल फरहान शेख २४ वर्ष, रा. जलनगर ता. जि. चंद्रपुर याच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि. काशिनाथ सेडमाके, पोस्टे आष्टी हे करीत आहेत. 

सदर दोन्हीे कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली  एम. रमेश यांच्या आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक अभियान. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक प्रशासन . गोकुल राज जी., सहायक पोलीस अधीक्षक, गडचिरोली अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि अरुण फेगडे, सपोनि. भगतसिंग दुलत व पोस्टे गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. विनोद चव्हाण, पोस्टे आष्टीचे प्रभारी अधिकारी पोनि विशाल काळे व पोउपनि काशिनाथ शेडमाके व स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार पोहवा/सुधाकर दंडिकेवार पोअं/रोहीत गोंगले चापोशी/दिपक लोणारे यांनी पार पाडली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos